बीड : खड्ड्यात पडून दहावीतील युवकाचा मृत्यू

बीड : खड्ड्यात पडून दहावीतील युवकाचा मृत्यू www.pudharinews.
बीड : खड्ड्यात पडून दहावीतील युवकाचा मृत्यू www.pudharinews.

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी कॅम्प येथील हनुमान मंदिराजवळ एका खड्ड्यात पडून दिस्तदिगर बिलाल शेख (वय १५) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २३) सकाळी दहाच्या दरम्यान घडली. पाटबंधारे विभागाच्या हालगर्जीपणामुळे युवकाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यातील सादोळा जलसिंचन उपसा योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम चालू आहे. या कामासाठी केसापूर येथील हनुमान मंदिराजवळ एक मोठा खड्डा खोदला होता. या खड्ड्यामध्ये पाईपलाईन फुटल्याने पाणी साचले होते. खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने केसापूर येथील नुकताच दहावीची परिक्षा दिलेला युवक दस्तदिगर बिलाल शेख याचा पाय घसरून मृत्यू पावल्याची घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news