बीड : गेवराईच्या तरूणाकडून गेली सहा वर्षे पायी दिंडीत वारकऱ्यांच्या पायांची सेवा

वारकऱ्यांच्या पायांची सेवा
वारकऱ्यांच्या पायांची सेवा

बीड : पुढारी वृत्‍तसेवा विठ्ठल नामाचा गजर करत वारीत पायी चालत असलेल्या प्रत्येक वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची आस असते. वारीत रात्रंदिवस चालत विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना आपल्या शारीरिक कष्टांतही सुख वाटते. रोज चालणं, ऊन-पावसाची तमा न बाळगता केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीनं वारकरी चालत असतात. वारकऱ्यांच्या या भक्तीमय वातावरणात त्यांची सेवा करत हात – पायाची मालिश करून वारकऱ्यांच्या पायाची सेवा करण्याचं काम गेवराई येथील रणजित बरकसे हा तरूण गेल्या सहा वर्षांपासून करत आहे. त्याच्या या सेवेचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून आषाढी वारीकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या सर्वच भागातून तसेच राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक वारीसाठी पंढरपूर येथे जातात. विठ्ठल नामाचा गजर करीत हजारो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी चालत जातात. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांमध्ये जेष्ठ मंडळी मोठ्या संख्येने सहभागीअसतात. ऊन-पावसाची तमा न बाळगता केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीनं वारकरी चालत असतात. वारकऱ्यांच्या या भक्तीमय वातावरणात त्यांचीच सेवा करुन माणुसकी जपण्याचं काम गेवराई येथील रणजित बरकसे हा तरुण गेल्या सहा वर्षांपासून करत आहे.

रणजित बरकसे हा दरवर्षी माजी नगरसेवक बंडूसेठ मोटे यांच्यासोबत पायी वारी करतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पंडित महाराज क्षीरसागर यांच्या दिंडी क्रमांक १४७ मध्ये तो पायी जातो. विषेश म्हणजे स्वतः पायी वारी करुण वारीत चालून थकल्या भागल्या पायांना, पावलांना तेल लावून मालिश करण्याची सेवा तो आनंदानं करतो. दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करत असताना पायी चालत असताना रस्त्याच्या कडेला बसलेल्या वारकऱ्यांची पायाची सेवा देखील तो करतो.

रणजितने मालिश केल्यानंतर आराम मिळतो व पंढरीचा पुढचा प्रवास आम्ही आणखी उत्साहानं करतो. आमची वाट सोपी होते, अशा शब्दांत वारकरी रणजित बद्दल भावना व्यक्त करतात. रणजित वयाने लहान असला तरी देखिल त्याच्या या कार्यामुळे वारकऱ्यांनाही रणजित बद्दल तेवढंच प्रेम आणि कौतुक वाटतं. त्याच्या या सेवाकार्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर देखिल व्हायरल झाले असून, रणजितच्या या सेवाकार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचा : 

अवघाचि संसार सुखाचा करीन आनंदें भरीन तिन्ही लोक जाईन गे माया तया पंढरपूरा भेटेन माहेरा आपुलिया
या प्रमाणे वारीत अनेक वारकरी पायी वारी करतात. पहिल्या वर्षी मी देखील गेलो, तेव्हा अनुभवलं. अगदी साठी मधील लोक चालतात. त्यांची आपण सेवा केली पाहिजे. हा मनात विचार करून मी गेली सहा वर्षे वारीत चालतो. जिथे विसावा होतो तिथे मी वारकऱ्यांच्या पायाची मालीश करतो. त्यांना छान वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदा मध्येच मला माझा विठूराया दिसतो …‌
रणजित बरकसे, गेवराई

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news