बीड : बाजार समिती निवडणुकीत पराभवाची धुळ; पंकजा मुंडे यांना धोक्याची घंटा (APMC Election)

बीड : बाजार समिती निवडणुकीत पराभवाची धुळ; पंकजा मुंडे यांना धोक्याची घंटा (APMC Election)
Published on
Updated on

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : देशाचे राष्ट्रीय सचिव पद भूषविणार्‍या पंकजा मुंडे, गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांना आपल्या मतदार संघातील बाजार समिती निवडणूकीत पराभव पत्कारावा लागला आहे. तसेच केजच्या आमदार नमिता मुंदडा व रमेश आडसकर यांना केज बाजार समितीत विजय मिळवून देखील त्यांना मोठी चपराक बसल्याचे मानले जात आहे. एकीकडे भाजपमध्येच पंकजा मुंडे यांचे नाराजी नाट्यसत्र चालु असताना जिल्ह्यातील बाजार समित्यातील अपयश हे त्यांना धोक्याची घंटा मानली जात आहे.

बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये भाजपच्या मंत्र्यांच्या मतदार संघातील बहुतांशी बाजार समित्या महाविकास आघाडीकडे गेल्यामुळे भाजपला मोठ्या चिंतनाची गरज आहे. मुळशीचे खासदार दादा भुसे या मातब्बर मंत्र्यांच्या मतदार संघातील बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्या आहेत. भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती होत आहे की काय? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. देशाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात तळ ठोकून होत्या. परंतु त्यांना यामध्ये यश आलेले नाही. मतदाराशी गाटी-भेटी व दिल्ली मुंबईच्या फेऱ्यांच्या चक्रामध्ये अडकले असल्यामुळे मतदार त्यांच्या पासुन दुरावत जात आहेत की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. गेवराईमध्ये आमदार लक्ष्मण पवार व माजी आमदार यांनी पॅनल उभे करून देखील बाजार समिती ताब्यात घेण्यात यश आलेले नाही. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने बाजार समितीत मोठे यश प्राप्त केले आहे.

परळीच्या बाजार समितीमध्ये राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून देखील एकही जागा आपल्या पक्षाकडे निवडून आणता आले नाही. उलट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पॅनलने संपुर्ण उमेदवार निवडून आणण्यात यश मिळविले आहे. केज मतदार संघात केजची बाजार समिती हाबाडा फेम असणारे रमेश आडसकर यांनी कायम ठेवल्याने आमदार मुंदडा यांना मोठा उमेदवार मानला जात आहे. परंतु मुंदडा यांचे होमपीचवर्क असणारी अंबाजोगाईची बाजार समिती मात्र व्यापारी व हमाल मापाडी या तीन उमेदवारांवरच समाधान मानावे लागले आहे. महाविकास आघाडीला पंधरा जागांवर यश आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news