बीड : परळीत रेल्वे उ्डाणपुलावर अपघात, मोटारसायकल-रिक्षाच्या धडकेत तरुण ठार

बीड : परळीत रेल्वे उ्डाणपुलावर अपघात, मोटारसायकल-रिक्षाच्या धडकेत तरुण ठार
Published on
Updated on

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : परळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर मोटारसायकल व रिक्षाच्या धडकेत एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (दि.25) सायंकाळी ही घटना घडली.

या प्रकरणाची माहिती अशी की, परळी तालुक्यातील डाबी येथील संपत्ती पारवे व निकम इंगळे हे दोन तरुण मोटारसायकलवरुन थर्मल परिसरातील संभाजी चौकातून उड्डाणपुल मार्गे परळी शहरात येत होते. पुलावर त्यांच्या मोटारसायकलला भरधाव वेगात येणार्‍या अ‍ॅटोरिक्षाने पाठीमागून जोराची धडक दिली. यामुळे संपत्ती पारवे (वय 26, रा.डाबी) हा तरुण जागीच ठार झाला. त्याच्या डोक्याला मोठी जखम झाल्याचे आढळून आले. त्याचबरोबर त्याचा मित्र निकम इंगळे हा देखील या अपघातात गंभीर जखमी झाला. उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. या प्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news