

पैठण; पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथे आंदोलकावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ पैठण येथे सह्याद्री चौकात मराठा मोर्चाच्या वतीने लाठीहल्ला करणाऱ्या सरकारचा निषेध करून टायर जाळून रास्ता रोको आंदोलन झाले. दरम्यान रविवारी (दि. ३ सप्टेंबर) रोजी पैठण शहर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी (दि. २ सप्टेंबर) रोजी सकाळी पैठण येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून लाठी हल्ला करणाऱ्या शासनाविरुद्ध घोषणाबाजी करून महाराणा प्रताप चौक बसस्थानक पाण्यात पंचायत समिती मार्गे छत्रपती संभाजीनगर रोडवरील हॉटेल सह्याद्री चौकात रस्ता रोको आंदोलन केले यावेळी अहमदनगर, पाचोड, शहागड शेवगाव रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. याप्रसंगी आशुतोष गायकवाड, विनोद तांबे, दीपक मोरे, दत्तात्रय गोडे, अनिल, किशोर चौधरी, किरण काळे, शहादेव लोहारे, संतोष गोबरे, श्याम काळे, अरुण काळे, आशिष मापारी, रामेश्वर बावणे, श्याम जगताप,शिवराज पारीख, ज्ञानदेव मुळे, संतोष तांबे, सुरेश शेळके इत्यादी मराठी समाजाचे मान्यवर समाज बांधव मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेले आहे. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, मनोज वैद्य, महेश माळी, यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.