बीड : सिरसाळा येथील जिनिंग फॅक्टरीत ४८ लाखांची चोरी

बीड : सिरसाळा येथील जिनिंग फॅक्टरीत ४८ लाखांची चोरी

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा

सिरसाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका जिनिंग फॅक्टरीमध्ये मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत ओमकार उत्तमराव खुरपे यांनी पोलीसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरी करण्यात आलेल्या जिनिंग फॅक्टरीच्या तिजोरीतून सुमारे 48 लाख रुपये चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. त्यानुसार कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ओंकार खुर्पे आणि त्यांच्या इतर दोन भावांचा भागीदारीत कौडगाव घोडा ता. परळी येथे पोर्णीमा कॉटन जिनिंग अँन्ड प्रेसिंग फॅक्टरी गेल्या पंधरा वर्षांपासून आहे. खर्पे हे बाहेरगावी असल्याने व दोन दिवस सलग बँकेला सुट्टी असल्याने कापुस खरेदीसाठी फॅक्टरीचे कॅशिअर अशोक भिमराव साळुखे व निलेस विलासराव देशमुख यांनी 24 डिसेंबर रोजी परळी येथील बँकेतून 50 लाख रूपये काढून आणली होती. यापैकी काही रक्कम साळुखे यांनी त्याच दिवशी काही शेतक-यांना वाटप केली व उर्वरीत 47 लाख 78 हजारांची रक्कम फॅक्टरीतील लोखंडी तिजोरीत ठेवली.

त्यानंतर दि 25 डिसेंबर रोजी रात्री 03.18 वाजण्याच्या सुमारास कंपनीतील कचरु हारकाळ यांनी फोनद्वारे तिजोरीतील रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची माहिती दिली. ही माहिती आपण पोलीसांसह इतर दोन भावंडाना दिली. यावरून सिरसाळा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक प्रदीप एकसिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news