राज्य सरकारचे आमच्याविरोधात षडयंत्र : मनोज जरांगे

मनोज जरांगे
मनोज जरांगे

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: राज्य सरकार आमच्या विरोधात षडयंत्र घडवून आणत आहे. यात मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माणसांचा सहभाग आहे. हा प्रकार थांबविला नाही तर त्या ओएसडीचे नाव उघड करीन, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.१२) दिला.

सरकारने सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, हैद्राबाद गॅझेट स्वीकारण्याबद्दल सरकारने सांगावे, सरकारने आरक्षणाबाबतचा टाईमबॉण्ड सांगावा, मंत्री येथे आल्याशिवाय आणि चर्चा झाल्याशिवाय काही गोष्टी सांगणे शक्य नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे, तरच उपोषण स्थगित करू, अन्यथा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आम्हाला विधानसभा निवडणूक लढावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सरकार उगीचच आढेवेढे घेत आहे. सरकारला मुद्दामहून जातीयतेढ निर्माण करायचा आहे का ? असा सवाल करून ओबीसी नेते समजूनच घेत नाहीत. मुळात ओबीसींना धक्काच लागत नाही. ओबीसींचा याच्याशी संबंध येत नाही. मराठा हाच कुणबी आहे, कुणबी हाच मराठा आहे. केवळ प्रसिद्धीसाठी लक्ष्मण हाके अंतरवाली येथे ओबीसी समाजासाठी आंदोलन करणार आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news