उपचारासाठी मनोज जरांगेंची मनधरणी: डॉक्टरांचे पथक अंतरवालीत | पुढारी

उपचारासाठी मनोज जरांगेंची मनधरणी: डॉक्टरांचे पथक अंतरवालीत

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मागील चार दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची आज (दि.११) प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घ्यावेत, यासाठी डॉक्टरांचे पथक अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासह अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके जरांगेंची मनधरणी करत आहेत.

मनोज जरांगे यांची उपचारासाठी मनधरणी का?

  • मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली
  • रक्तदाब कमी झाला,  शरीरातील पाण्याची पातळी कमी
  • डॉक्टरांचे पथक अंतरवाली सराटीत दाखल
  • जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडून मनधरणी

जरांगे यांच्यावर तत्काळ उपचाराची गरज

आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे यांची तब्येत खालावली आहे. सगे सोयरे कायद्याच्या अमंलबजावणीसाठी त्यांनी पुन्हा आमरण उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे तसेच शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ उपचाराची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाकडून आणि डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत.

जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी अंतरवाली सराटीकडे धाव घेतली. तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील या दोघांनीही त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. मात्र, ही विनंती धुडकावून लावली. ते उपचार घेत नसल्याचे सरकारला लेखी कळवले आहे. तसेच राज्य शासनाच्या शिष्टमंडळाबाबत अजून कोणताही निरोप मिळालेला नाही, असे ही तहसीलदार शेळके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा 

Back to top button