परभणी: बळीराजा साखर कारखान्याकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता जमा

बळीराजा साखर कारखाना
बळीराजा साखर कारखाना

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखान्याने ऊस बिलाचा दुसरा हप्ता १८.३८ कोटी  नुकताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. कारखान्याने गळीत हंगाम सन २०२३-२४ मध्य ज्या शेतक-यांनी ऊस पुरवठा केलेला आहे. त्यांना प्रति मे. टन २२०० रुपये प्रमाणे पहिली उचल ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली आहे.

गाळप हंगाम २०२३-२४ मध्य ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतक-यांना ऊस खरेदी करार, संमती पत्र प्रमाणे केलेले असून त्या प्रमाणे ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रति मे. टन ३०० रुपये प्रमाणे आज (दि. १०) पासून शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा  करण्यात आला आहे.

हंगाम २०२३-२४ ची अंतिम एफआरपी अंदाजे प्रति मे. टन २८०० रुपये राहील. व तिसरा हप्ता करारा प्रमाणे दिपावलीच्या पूर्वी देण्यात येईल. याची ऊस उत्पादक सभासदांनी  नोंद‌ घ्यावी.  हंगाम २०२४-२५ साठी सहकार्य करावे, असे अवाहन बळीराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news