धाराशिव: येरमाळा येथे वादळी वाऱ्याने पत्रे उडाले, लाखाेंचे नुकसान | पुढारी

धाराशिव: येरमाळा येथे वादळी वाऱ्याने पत्रे उडाले, लाखाेंचे नुकसान

येरमाळा: पुढारी वृत्तसेवा: येरमाळा येथे आज (दि.२५) दुपारी साडेपाचच्या दरम्यान सुमारे आर्धा तास चक्राकार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. चौरस्त्यावरील हॉटेल समोर झाडे पडली. तर नवीन झालेल्या हॉटेलच्या शेडचे पत्रे उडून गेले. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण, चक्राकार, सोसाट्याच्या वारा होता, वातावरणात प्रचंड उकाडा होता. साडेपाच वाजता अचानक वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस अर्धा तास झाला. यात नवीनच झालेले चौरस्त्यावरील हॉटेलचे मोठे नुकसान झाले.  राजभाऊ टेकाळे यांच्या मालकीचे हे हॉटेल होते. वादळी वाऱ्याने पत्रे उडून गेली. तर हॉटेलतील दोन फ्रिज, टेबल खुर्च्या पत्रे पडून लाखोंचे नुकसान झाले.  या हॉटेल समोरील झाडे कोसळून पडल्याने हॉटेल शेडचे नुकसान झाले आहे. तर गावातील बऱ्याच हॉटेलचे पत्रे, बोर्ड, घरावरील पत्रे, सोलार पॅनल उडून गेल्याने नुकसान झाले आहे. येरमाळा येथील कुक्कुटपालन शेडचे पत्रे उडून गेली आहेत.

या वादळी वाऱ्यामुळे  झालेल्या  नुकसानीचे महसूल विभागाकडून  पंचनामे व्हावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा 

Back to top button