वसंत मोरेंच्या जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा | पुढारी

वसंत मोरेंच्या जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते वसंत मोरे यांनी आज अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मोरे यांनी शुक्रवारी पुणे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी जरांगेंची भेट घेतल्याने नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगली आहे.

वसंत मोरे हे मनसेचे मात्तबर नेत्यांपैकी एक होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ते अत्यंत निकटवर्ती समजले जात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

मी जरांगे पाटलांच्या दर्शनासाठी आलो होतो.पण चर्चा झाली नाही.कागदावर माहिती दिली.काल प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोललो.मी मनसे पक्ष सोडला तसे निवडणुक लढवण्यावर ठाम आहे.मी सकल मराठा समाजाचा पाईक आहे.आमच्या पुण्याच्या लोकांनी आमची माहिती दिली आहे आणि त्यामध्ये माझी बाजू मांडली आहे.जरांगे पाटील माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील.माझी परत एकदा जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा होणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली.

Back to top button