Lok Sabha Election 2024 : राज्यात लवकरच राजकीय भूकंप : संजय शिरसाट

Lok Sabha Election 2024 : राज्यात लवकरच राजकीय भूकंप : संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अनेक पक्षातील मोठे नेते शिवसेनेच्या  (शिंदे गट) संपर्कात आहेत. सोमवारपर्यंत राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, असे भाकित करून राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती सरस ठरेल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी आज  (दि.15) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. Lok Sabha Election 2024

आमदार शिरसाट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. सोमवार पर्यंत राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. अनेक पक्षातील मोठे नेते आमच्या  संपर्कात आहेत. त्यामुळे लोकसभेचे  चित्र वेगळे असेल. राज्यात महायुती सरस ठरेल. Lok Sabha Election 2024

आंबेडकर इतर पर्याय निवडतील

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत राहणार नाहीत. आज (दि.१५) झालेल्या बैठकीत आंबेडकरांना बोलावले नाही. यातच सर्व काही आले. आंबेडकर स्वबळावर लढतील किंवा दुसरा पर्याय निवडतील. आमच्याकडे जागा फुल्ल झाल्याने त्यांच्यासोबत आमची बैठक होणार नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

 Lok Sabha Election 2024  एमआयएमचे अस्तित्व संपले

एमआयएम पक्षाचे राज्यातील अस्तित्व संपले आहे. ते लढले तरी कोणत्याही परस्थितीत ते निवडून येणार नाहीत. ते केवळ मते पळविण्याचे काम करणार आहेत. त्याचा परिणाम आमच्यावर काहीच होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

असीम सरोदे नवीन पक्षप्रमुख

संजय राऊतच्या बडबडीत सगळे विषय संपले आहेत. म्हणून शिवसेना ठाकरे गटाने आता असीम सरोदे हा नवीन माणूस नेमला आहे.    तेच सध्या पक्ष प्रमुखांची भूमिका बजावत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news