छोटा हत्‍ती आणि दुचाकीची समोरासमोर धडक; युवक ठार | पुढारी

छोटा हत्‍ती आणि दुचाकीची समोरासमोर धडक; युवक ठार

आखाडा बाळापूर ; पुढारी वृत्तसेवा

कामठा फाटा येथील सशस्त्र सीमा बल कॅम्प समोर काल (शनिवार) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कळमनुरीकडे जाणाऱ्या छोटा हत्ती व कळमणुरी कडून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये मध्यवर्ती बँकेत कर्मचारी असलेला कांडली येथील युवक ठार झाला. प्रमोद देविदासराव पानपट्टी ( रा. कांडली ता. कळमनुरी ) असे मृत युवकाचे नाव आहे.

छोटा हत्ती (एम एच 29 एटी 05 29 )हा कळमनुरीकडे येत होतh तर कळमणुरीकडून प्रमोद पानपट्टे हे दुचाकी ( एम एच 38 76 37 ) वरून येत होते. कामठा फाटा येथील कॅम्पजवळ समोरा-समोर दोन्ही वाहनांची धडक झाली. सशस्त्र सीमा बल कॅम्प जवळ गार्डवर असलेल्या जवान महेश कोकितकर यांच्यासमोर हा अपघात झाला. त्‍यांनी सशस्त्र सीमा बल कॅम्‍प मधील ॲम्बुलन्स चालकास या अपघाताची माहिती मिळाली.

आखाडाबाळपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचार करण्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. छोटा हत्ती वाहनाचा चालक घटनास्‍थळावरून फरार झाला. जखमी प्रमोद यास आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचलं का?

Back to top button