हिंगोली: कळमनुरी येथे रात्री गस्त घालताना वाहन उलटून तीन पोलीस जखमी | पुढारी

हिंगोली: कळमनुरी येथे रात्री गस्त घालताना वाहन उलटून तीन पोलीस जखमी

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : शहरात रात्री गस्त घालताना कळमनुरी पोलिसांचे वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाले. या अपघातात ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर वाहनाचे मोठे नुकसान झाले. ही घटना (दि. २१) मध्यरात्री २ च्या सुमारास नांदेड – हिंगोली रस्त्यावरील लमाण देव मंदिराजवळ घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळमनुरी पोलीस ठाण्याचे वाहन रात्री गस्त घालत असताना शहरातील लमानदेव मंदिराजवळ चालकाचा ताबा सुटल्याने वाहन उलटले. यामध्ये वाहनातील पोलीस कर्मचारी व्यंकटेश मंगरूळकर, यादव कुळमथे, होमगार्ड लखन जाधव गंभीर जखमी झाले. नागरिकांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी हिंगोली रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील चौकशी कळमनुरी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button