

केज; पुढारी वृत्तसेवा : लातूर, बीड व धाराशिव या तीन जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून लातूर शहराला होणारा पाणीपुरवठा आज (दि 29) बंद करण्यात आला. मागील अनेक दिवसापासून बिगर सिंचन पाणीपट्टी न भरल्यामुळे हा थकबाकीचा आकडा कोटीत गेल्यामुळे कार्यकारी अभियंता यांच्या सूचनेवरून पाणीपुरवठा बंद करण्याची कार्यवाही केल्याची माहिती पाटबंधारे सिंचनचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली
केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून बीड , लातूर व धाराशिव या तीन जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या तालुक्यासह वीस पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत यात प्रामुख्याने लातूर शहर , लातूर औद्योगिक वसाहत , अंबाजोगाई शहर , केज शहर , धारूर शहर , कळंब शहर , व ईतर ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे यातील लातूर शहर व औद्योगिक वसाहतीकडेच पाणीपट्टीपोटी अडोतीस कोटी पेक्षाही अधिकची बाकी आहे हि भरण्यासाठी दोन्हीच्या प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आला परंतु सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने काल दि 29 रोजी कार्ययकारी अभियंता अमरसिंह पाटील यांनी धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाचे पाटबंधारे सिंचन शाखा क्र 1 चे शाखाधिकारी सूरज निकम यांना लातूर शहराचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार निकम यांनी याची अमलबजावणी करत पाणीपुरवठा बंद केला एकूणच पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे लातूरकरां चा पाणीप्रश्न उन्हाळ्याच्या पार्श्ववभूमीवर गंभीर होतो कि थकबाकी भरून प्रशासन तो तात्काळ पूर्ववत करून घेतो हे काही दिवसात कळेलच तसेच लातूरकरांवर झालेली कार्यवाही हि ईतर गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सूचना ठरते कि आगामी दिवसात ईतर योजनांवर देखील अशीच कार्यवाही होते हे पाहावे लागेल.