बीड: माजलगाव येथील शिवसैनिक सतीश बोठे यांचा अपघाती मृत्यू | पुढारी

बीड: माजलगाव येथील शिवसैनिक सतीश बोठे यांचा अपघाती मृत्यू

माजलगाव: पुढारी वृत्तसेवा : माजलगाव येथील ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक सतीश धोंडीबा बोठे (वय ५०) यांचे आज (दि.१७) मोटर सायकल बस अपघातात दुर्दैवी निधन झाले. ही घटना आज (दि.१७) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. बोठे यांच्या अपघाती निधनावर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी साडेतीनच्या सुमारास सतीश बोठे आपल्या मोटरसायकलवरून पाथरी रोडवरून माजलगावकडे येत होते. यावेळी परभणी फाट्यावर शिवनेरी हॉटेलजवळ त्यांच्या मोटरसायकलला बसने धडक दिली. माजलगाव- खतगव्हाण (एमएच ४० एन ९२ २५) ही बस दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या बोठे यांच्या मोटर सायकलला बसने धडक दिली. या अपघातात बोठे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेचे वृत्त कळताच माजी तालुकाप्रमुख सतीश सोळंके, शिवसैनिक अनंत अप्पा सोळंके, ज्ञानेश्वर मेंडके, माऊली काशीद, अमोल डाके, सूरज एखंडे, अशोक अळणे, विनायक रत्नपारखी, सतीश जोशी, कल्याण बल्लाले, दीपक मेंडके, अरुण राऊत आणि नातेवाईकांनी रुग्णालयात मोठे गर्दी केली. बोठे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा 

Back to top button