जालना : परतूर येथे घातक औषधींचा साठा जप्त | पुढारी

जालना : परतूर येथे घातक औषधींचा साठा जप्त

जालना, पुढारी वृत्तसेवाः मानवी आरोग्यास घातक असलेले एन.डी.पी.एस. घटक प्रतिबंधीत गुंगीकारक औषध (गोळ्या) विक्री करणार्‍या आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या पथकाने कारवाई करीत 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जालना जिल्ह्यात मानवी आरोग्य घातक असलेले व एनडीपीसी घटक प्रतिबंधीत गुंगीकारक ओषधी व टॅबलेट (गोळ्या) विक्री करणारे इसम सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सूचना दिल्या होत्या.

त्यावरून अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खनाळ यांनी स्थागुशाचे वेगवेगळे पथक तयार करुन परतूर ते वाटुर रोडवर छापा मारुन संशयित अब्दुल ऊर्फ मोहम्मद बोगदीन (रा. चाऊसगल्ली गावभाग परतुर ता. परतूर) यांच्यावर छापा टाकून त्याच्याकडून मानवी आरोग्यास अपायकारक व नशेकरिता गैरवापर होणारे प्रतिबंधीत घटक असलेल्या गोळ्या (टॅबलेट) व ओषधी असा 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अन्न व औषधी निरीक्षक श्रीमती वर्षा महाजन यांच्या उपस्थितीत सदर माल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुध्द परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि खांडेकर, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस वाघमारे, रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, सचिन चोधरी, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, विजय डिक्कर, सतीश श्रीवास, अक्रूर धांडगे, देविदास भोजने, धीरज भोसले, धम्मपाल पैठणे यांनी केली आहे.

प्रतिबंधीत औषधींमुळे खळबळ

जालना शहरासह जिल्हयात प्रतिबंधीत औषधी विक्री होत असल्याची चर्चा होती. या बाबत एका लोकप्रतिनिधीने आवाज उठवीत कारवाईची मागणीही केली होती.प्रतिबंधीत औषधींचा वापर गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक करीत असल्याने खून व मारामारीसह इतर गुन्ह्यात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा शाखेने केलेली कारवाईचे कौतुक होत आहे. अन्न व औषधी प्रशासनानेही अशा कारवाया करणे आवश्यक आहे.

Back to top button