छत्रपती संभाजीनगर : रांजणगावात शेजार्‍यावर तिक्ष्ण हत्याराने वार | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : रांजणगावात शेजार्‍यावर तिक्ष्ण हत्याराने वार

वाळूज महानगर,पुढारी वृत्तसेवा : शेजारी राहणार्‍या महिलांमध्ये पाच महिन्यापूर्वी किरकोळ वाद झाल्याचा राग मनात धरून एकाने 42 वर्षीय इसमास तिक्ष्ण हत्याराने वार करुन जखमी केल्याची घटना 5 जानेवारी रोजी रांजणगाव येथे घडली.

या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच महिन्यापूर्वी काकासाहेब शेलार (रा.गांधीनगर, रांजणगाव) यांच्या घरातील महिलांचा त्यांच्या शेजारी राहणार्‍या महिलांसोबत वाद झाला होता. याचा राग मनात धरून त्यांच्या शेजारी राहणार्‍या संदीप पोपळे याने मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास काकासाहेब यांना शिवीगाळ सुरु केली. वाद नको म्हणून ते घरात जात असतांना पाठीमागुन आलेल्या संदीप पोपळे याने चाकु सारख्या तिक्ष्ण हत्याराने काकासाहेब शेलार यांच्या कानावर वार केला.

या घटनेत ते जखमी झाल्याने त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा सुरू केली. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील लोक तेथे आले असता त्यांना पाहून संदीप घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी काकासाहेब शेलार यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात संदीप पोपळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button