पैठण : ड्रग्ज प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या अपेक्स कंपनीतच पुन्हा चोरी | पुढारी

पैठण : ड्रग्ज प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या अपेक्स कंपनीतच पुन्हा चोरी

पैठण; पुढारी वृत्तसेवा ; पैठण एमआयडीसी परिसरातील अपेक्स केमिकल कंपनीत ड्रग्ज प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी मौल्यवान मशिनरीची वस्तू चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी महसूल गुप्तचर (डीआरआय) संचालनाचे पथक पैठण एमआयडीसी दाखल झाले आहे.

संबंधित बातम्या 

अधिक माहिती अशी की, मागील महिन्यात पैठण एमआयडीसी परिसरातील महालक्ष्मी व अपेक्स कंपनीत ड्रग्ज तयार करण्यात येत असल्याचा प्रकार आढळून आला होता. यामुळे महसूल गुप्तचर संचालनालय ( डीआरआय) यांनी छापा टाकून पुढील तपासासाठी पैठण एमआयडीसीमधील महालक्ष्मी अपेक्स केमिकल कंपनीला सील लावून जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती.

या ड्रग्ज प्रकरणी तपास सुरू असताना मंगळवार ते बुधवार रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद कंपनीत प्रवेश करून मौल्यवान असलेल्या मशनरीमधील किमती पार्ट चोरी करण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. सदरील प्रकाराची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे यांनी कंपनी ताब्यात असलेले महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) विभागाला माहिती देण्यात आली.

गुरुवारी ( दि.२१) रोजी पैठण एमआयडीसी येथील जप्त केलेल्या केमिकल कंपनीत सदरील विभागाचे अधिकारी पथक दाखल झाले. या कंपनीत कुठल्या वस्तूची चोरी करण्यात आली याबाबत पंचनामा करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येणार आहे.

Back to top button