धाराशिवमध्ये जरांगे पाटील यांची तीन गुंठा जागेत भव्य प्रतिमा | पुढारी

धाराशिवमध्ये जरांगे पाटील यांची तीन गुंठा जागेत भव्य प्रतिमा

धाराशिव; पुढारी वृत्तसेवा : धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची एक लाख तीस हजार चौरस फूट जागेवर भव्य प्रतिमा साकारली आहे. फायर आर्टच्या माध्यमातून कलाकार मंगेश निपाणीकर यांनी ही भव्य प्रतिमा तयार केली आहे. लोहारा-माकणी रोडलगत खेड पाटीजवळ ही प्रतिमा साकारली आहे.

लोहारा तालुक्यातील माकणी-करजगाव या ठिकाणी सोमवारी (दि. ११) सकाळी १० वाजता मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जरांगे पाटील यांची भव्य प्रतिमा हे खास आकर्षण असणार आहे, दै. पुढारीसाठी तानाजी माटे, लोहारा.

Back to top button