लातूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे | पुढारी

लातूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

लातूर ; पुढारी वृत्‍तसेवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे लातूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे आगमन लातूर शहरात झाले. यावेळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मराठा बांधवांनी त्‍यांना काळे झेंडे दाखवले. दरम्‍यान पोलिसांनी आंदोलकांना बाजुला करत बावनकुळे यांचा ताफा मार्गस्‍थ केला. यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या जोरदार घोषणा दिल्‍या.

आज चंद्रशेखर बावनकुळे हे लातूर शहराच्या दौर्‍यावर आले असताना हा प्रकार घडला. यावेळी मराठा समाज बांधवांनी बावनकुळे यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर जात वाहनांना अडवण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी त्‍यांना काळे झेंडे दाखवले व मराठा आरक्षणाच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी तात्‍काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर गाड्यांचा ताफा पुन्हा मार्गस्थ झाला.

Back to top button