Manoj Jarange Patil : जालन्यात ८० एकर क्षेत्रावर मनोज जरांगे-पाटीलांची आज सभा | पुढारी

Manoj Jarange Patil : जालन्यात ८० एकर क्षेत्रावर मनोज जरांगे-पाटीलांची आज सभा

जालना : पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील नवीन मोंढा रोडवरील पांजरपोळच्या प्रांगणावर शुक्रवारी (1 डिसेंबर) मनोज जरांगे ( Manoj Jarange Patil ) यांची जाहीर सभा दुपारी 2 वाजता होणार आहे. 80 एकर क्षेत्रावर होणार्‍या या सभेपूर्वी काढण्यात येणार्‍या दुचाकी रॅलीत 20 हजार दुचाकीस्वार सहभागी होणार आहेत.

10 ते 12 टन फुलांची वृष्टी यावेळी करण्यात येणार असून, 101 तोफांची सलामी जरांगे यांच्या स्वागतासाठी दिली जाईल. मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपांना जरांगे हे या जाहीर सभेतून कोणते उत्तर देतात, तसेच आंदोलनाची पुढची दिशा काय ठरवितात, याकडे समाज बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. ( Manoj Jarange Patil )

Back to top button