औरंगाबादमध्‍ये तरुणाचा खून, तीन संशयित ताब्यात | पुढारी

औरंगाबादमध्‍ये तरुणाचा खून, तीन संशयित ताब्यात

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा

येथील आंबेडकर नगरमध्ये रविवारी पहाटे तरुणाचा खून करण्‍यात आला. योगेश नारायण घुगे (रा. शिवनेरी कॉलनी, सिडको) असे त्‍याचे नाव आहे. योगेश हा डॉ. चित्रा डकरे खून प्रकरणातील आरोपी अमोल घुगे याचा भाऊ हाेता. या प्रकरणी सिडको पोलिसांनी तीन संशयित ताब्यात घेतले आहेत.

दरम्यान, योगेशला पहाटे तीन वाजता काही तरुणांनी आंबेडकर नगरात मारहाण केली होती. त्याला रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. उपचारादरम्यान मृत्यू झाला, सिडको पोलिसांनी तीन संशयित ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, डॉ. चित्रा डकरे खून प्रकरणातील आरोपी अमोल याचीही गतवर्षी हत्या करण्यात आली होती.

Back to top button