परभणी : मराठा आरक्षणासाठी मैराळसावंगीतील तरुणाने जीवन संपविले | पुढारी

परभणी : मराठा आरक्षणासाठी मैराळसावंगीतील तरुणाने जीवन संपविले

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मैराळसावंगी येथील अशोक रंगनाथ जाधव या ३० वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी आपले जीवन संपवले. ही घटना आज (दि.३१) सकाळी उघडकीस आली. शनिवारपासून (दि. २८) हा युवक घरातून बेपत्ता होता.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग असलेल्या अशोक याने मनोज जरांगे- पाटील यांच्या सभेसाठी अंतरवाली येथे सुद्धा उपस्थिती लावली होती. मनोज जरांगे- पाटील दुसऱ्यांदा उपोषणास बसल्यानंतर अशोक अस्वस्थ असल्याचे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी सांगितले. बुधवारी (दि. २५) रात्री ४ वाजता अशोकने कुणासही न सांगता मोबाईल घरी ठेवून बेपत्ता झाला. शुक्रवारी (दि.२७) अशोकच्या कुटुंबीयांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती.

आज सकाळी मैराळसावंगी येथील गोदावरी नदीकाठ शेजारील झाडाझुडपात अशोक याचा मृतदेह एका ग्रामस्थास आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अशोकच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी घटनास्थळीत धाव घेतली. सोनपेठ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत अशोकचा भाऊ कारभारी यांच्या फिर्यादीवरून नोंद केली आहे. मृत अशोक हा अविवाहित असून त्यांच्या पश्चात दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button