परभणी: बलसाचे तंटामुक्त समिती अध्यक्ष, उपसरपंचाचा राष्ट्रवादीत प्रवेश

परभणी: बलसाचे तंटामुक्त समिती अध्यक्ष, उपसरपंचाचा राष्ट्रवादीत प्रवेश

जिंतूर: पुढारी वृत्तसेवा : मौजे बलसा ग्रामपंचायतीचे भाजपचे उपसरपंच रावसाहेब इलग आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णाजी इलग यांनी आज (दि.१३) राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार विजयराव भांबळे यांनी त्यांचा सत्कार करून राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या शुभेच्छा दिल्या.

भाजपच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आणि आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे त्या दोघांनी सांगितले.
यावेळी मनोज थिटे, बाळासाहेब घुगे, गणेश ईलग आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news