Maratha reservation : जरांगे-पाटील उपाेषणावर ठाम, सरकारला आणखी चार दिवसांची ‘डेडलाईन’ | पुढारी

Maratha reservation : जरांगे-पाटील उपाेषणावर ठाम, सरकारला आणखी चार दिवसांची 'डेडलाईन'

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मराठा आरक्षण प्रश्‍नी जालना येथे बेमुदत उपाेषणाला सुरु केलेले मनाेज जरांगे-पाटील यांची आज सायंकाळी राज्याच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली. यावेळी बेमुदत उपाेषणावर ठाम राहात, राज्‍य सरकारने आणखी चार दिवसांचा कालावधी घ्‍यावा;पण मराठा आरक्षणावर ठाेस ताेडगा काढावा, असे आवाहन जरांगे- पाटील यांनी राज्‍य सरकारच्‍या शिष्टमंडळाला केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी २९ ऑगस्टपासून जालना येथे जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. आज पुन्‍हा एकदा राज्याच्या शिष्टमंडळाने त्यांना उपोषण मागे घेण्‍यात यावे यासाठी मनधरणी केली.  शिष्टमंडळात मंत्री गिरीष महाजन, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अर्जुन खोपकर आणि मंत्री अतुल सावे यांचा समावेश होता. मराठा आरक्षणप्रश्‍नी ताेडगा काढण्‍यासाठी एक महिन्याचा वेळ मिळावा, अशी मागणी यावेळी महाजन यांनी केली.  आंदोलनात टोकाची भूमिका घेऊन चालत नाही असं महाजन म्हणाले. एका दिवसात जीआर निघणं अशक्य आहे, त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी जंरागे-पाटील यांना केली.

जरांगे-पाटील यांनी शिष्टमंडळाला आपली भूमिका स्पष्ट करत ठामपणे सांगितले की, मराठा आरक्षणप्रश्नी मी माघार घेणार नाही. मागील वेळेस सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिलेला होता मात्र तरीही कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नव्हता. त्यामुळे सध्या सरकारने यासंबंधी तात्काळ निर्णय द्यावा, या मागणीवर ते ठाम राहिले. सरकारने आणखी चार दिवसांचा कालावधी घ्‍यावा;पण मराठा आरक्षणावर ठाेस ताेडगा काढावा, असे आवाहन जरांगे- पाटील यांनी केले.

उपोषण न सोडता मुंबईला चला : जरांगे-पाटील

उपोषण न सोडता मुंबईला चला असं देखील पाटील यांनी मंत्रीमंडळाला सांगितले. पण माझ्यावर दबाव आणू नका, अध्यादेश काढा आणि विषय संपवा असं पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र चार दिवसांनंतर जर निर्णय दिला नाही तर पाणी देखील सोडणार असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

जरांगे पाटील यांच्या तब्यतेची आम्हाला काळजी : गिरीष महाजन

आम्हाला या अध्यादेश काढण्यासाठी वेळ देण्यात यावा. कायदेशीर बाबी पूर्ण करुन हे आरक्षण दिले जाईल असं आश्वासन यावेळी महाजन यांनी दिले. अध्यादेश काढल्यानंतर लगेच त्यावर स्थगिती मिळू नये याची काळजी आम्ही घेत आहोत त्यामुळे १ महिन्यांचा कालावाधी द्यावा. सगळं तयार आहे आरक्षण लवकरच मिळेल. आम्हाला जरांगे पाटील यांच्या तब्यतेची काळजी आहे. पण घाईघाईने कोणताही निर्णय घेतला जाऊ नये अशी आमची इच्छा आहे असं महाजन यावेळी म्हणाले.

हेही वाचा

Back to top button