राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारच; भुजबळांचा शरद पवारांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारच; भुजबळांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजच्या सभेसाठी जमलेला जनसमुदाय पाहून हे स्पष्ट होत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे अजित पवार आहेत. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या सोबत आहे, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. बीड येथील अजित पवार गटाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार सुंदरराव सोळंके उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार यांची इथे सभा झाली. पहिला सभा माझ्या मतदारसंघात येवला येथे झाली. दुसरा नंबर धनंजय मुंडे यांचा होता त्यांनी बीडमध्ये सभा घेतली. तिसऱ्या वेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघासाठी सभा घेतली. मात्र, बारामतीची वेळ आली तेव्हा त्यांनी अजित पवार आमचे नेते आहेत, असे म्हटले. आमच्या सर्वांच्या विरोधात सभा घेतल्या. मात्र, बारामतीत अजित पवार आमचे नेते आहेत, असं शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार तुमचे नेते आहेत, तर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता द्या आणि मोकळे व्हा, असे आवाहन भुजबळ यांनी शरद पवारांना केले. अजित पवार यांच्यासोबत आम्ही केवळ विकासासाठी आलो आहोत. आम्ही शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही. तुमच्यासोबत जे आमदार आहेत त्यांनीही भाजपसोबत जाण्यासाठी सह्या केल्या आहेत, असा दावाही छगन भुजबळ यांनी केला. तुम्ही येवल्यात जाऊन म्हणालात भुजबळांना उमेदवारी देऊन माझी चूक झाली. मी येवलेकरांची माफी मागतो. आता तुम्हाला गोंदिया पासून कोल्हापूर पर्यंत माफी मागत यावे लागेल. कारण ५४ आमदारांनी भाजपबरोबर जाण्यासाठी सह्या केल्या आहेत. तुम्ही किती ठिकाणी माफी मागणार आहात? असा सवालही भुजबळ यांनी केला.

भाजप बरोबर जाण्याचा रस्ता तुम्हीच दाखवला. २०१४ मध्ये तुम्ही भाजपला पाठींबा जाहिर केला. २०१९ मध्ये तुम्ही अजित पवारांना शपथ घ्यायला सांगितील. त्यानंतर तुम्ही म्हणता माझा गुगली होता. राजकारणात असे गुगली असतात का? असा सवालही भुजबळ यांनी केला. तुम्हाला काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आले तेव्हा केवळ मी एकटा तुमच्या पाठीशी उभा राहिलो, असा दावाही छगन भुजबळ यांनी केला.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news