बीड : अरबी शिकवणाऱ्या मौलानाकडून १३ वर्षीय मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल | पुढारी

बीड : अरबी शिकवणाऱ्या मौलानाकडून १३ वर्षीय मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : परळी शहरात अरबी भाषेची शिकवणी घेणाऱ्या मौलानाने शिकवणीला येणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन या व्यक्तीविरुध्द संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी शहरातील खुदबे नगर भागात शेख सोहेल गणी (रा. जुना रेल्वे स्टेशन) हे आरबी भाषा शिकवण्याची शिकवणी घेतात. याच भागातील १३ वर्षीय विद्यार्थीनी मागील आठ दिवसांपासून त्यांच्याकडे आरबी शिकण्यासाठी येत होती. दि. २२ ऑगस्ट रोजी शिकवणीहून घरी आल्यानंतर पिडित मुलगी रडू लागल्याने तिच्या आईने समजावून सांगत कारण विचारले. तिने मौलाना हा मला समोर बोलावुन विनयभंग करत असल्याचे सांगितले. याप्रकरणी या इसमाच्याविरुध्द संभाजीनगर पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.

Back to top button