ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी, तानाजी नावे नाहीत? छगन भुजबळांना दिले पुरावे | पुढारी

ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी, तानाजी नावे नाहीत? छगन भुजबळांना दिले पुरावे

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : वारंवार सरस्वती देवी तसेच ब्राह्मण समाजाबद्दल राज्य सरकार मधील मंत्री भुजबळ करत असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या विरोधात सकल ब्राह्मण समाजाकडून घोषणाबाजी करत तीव्र निषेध करण्यात आला. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात हे आंदोलन करण्यात आले. छगन भुजबळाना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना मंत्री पदावरून तात्काळ बाजूला करावे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी, तानाजी हे नाव दिसत नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. तसेच देवी सरस्वतीने किती व कोणत्या शाळा काढल्या असे विधानही त्यांनी केले होते. या वक्तव्यामुळे सकल ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. वारंवार सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य भुजबळ करत आहेत. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ मंत्री पदावरून हटवावे अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी, तानाजी नावे नसतात यावक्तव्याचाही समाज बांधवांनी समाचार घेत परळीत शिवाजी, संभाजी, तानाजी असे नावे असलेल्या ब्रह्मवृंदाचे आधार कार्डच भुजबळांना पाठवले. तसेच मोठ्या संख्येने पोस्ट कार्डही सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने पाठवले. या बाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी डाॅ. विवेक दंडे, दिलीप जोशी, प्रकाश जोशी, राजाभय्या पांडे, ॲड.अरुण पाठक, दत्तात्रय कुलकर्णी, चारुदत्त करमाळकर, प्रताप धर्माधिकारी, अजय जोशी, प्रशांत रामदासी, शिवाजी जोशी, शिवाजी नव्हाडे, शिवाजी कुलकर्णी, शिवाजी पुराणिक, शिवाजी पांडे, प्रमोद आवटी, गोपाळ कुलकर्णी, विश्वंभर देशमुख, प्रवीण नवाडे, मनोज जब्दे, ओंकार कुलकर्णी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छगन भुजबळ यांच्या माहितीसाठी परळी वैजनाथ येथील प्रातिनिधिक स्वरूपात यांची आधारकार्ड पाठवली. परळी शहरातील रहिवासी असलेल्या शिवाजी जोशी, शिवाजी नव्हाडे शिवाजी कुलकर्णी, शिवाजी पुराणिक,शिवाजी पांडे, संभाजी देशमुख, तानाजी देशमुख आदी नावे असणारंच आधारकार्ड पाठवण्यात आली.

Back to top button