गेवराई; पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारी परतुन येणा-या विदर्भाची पंढरी असलेल्या शेगांव येथील श्री संत गजानन महाराज पालखी मंगळवारी (दि. ११) रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील मोढा नाक्यावर शहरातील असंख्य भावीक भक्तांनी रांगोळी काढुन, फुलांची उधळण करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालखी शहरातील विविध मार्गावरून जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मुक्कामी थांबली. यावेळी पालखीचे शहरातील भावीकांनी दर्शन घेतले. यावेळी श्री संत गजानन महाराज सेवा समिती चे सदस्य व मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी विदर्भाची पंढरी असलेल्या शेगांव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी वारी परतुन मंगळवार रोजी श्रीची पालखी सकाळी पेंडगावं येथे सकाळचे जेवन करून सायंकाळी ६ वाजता शहरातील मोंढा नाका येथे आगमन होताच शहरातील भावीक भक्तानी रांगोळी काढुन, फुलांची उधळण करून,फटाके वाजवुन जल्लोषात स्वागत करून पालखी शहरातील मोढा नाका,पंचायत समिती रोड,जुने बसस्थानक मार्गे पालखी जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मुक्कामी थांबली.यावेळी पालखीचे असंख्य भावीक भक्तीनी दर्शन घेतले.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.