

धर्माबाद : पुढारी वृत्तसेवा: धर्माबाद शहरातील रत्नाळी येथे रविवारी मध्यरात्री (ता.९) शेती औजार ठेवलेल्या शंकर गंगाराम जल्लोड (वय ४२) यांच्या कोठ्यास मध्यरात्री अचानक मोठी आग लागली. या आगीत जवळपास ५ लाख ४२ हजारांची शेती औजार व घरगुती साहित्य जळून खाक झाले. फिर्यादीनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या शेतीमध्ये बी – बियाणे लागवडीचे काम सुरु आहे. या शेती कामासाठी लागणारे शेती औजारे (तुषारचे पाईप) सुरक्षित रहावे, म्हणून सुरेश पोतन्ना तोंडाकुरवाड, नागेश गंगाराम जल्लोड, गंगाधर उर्फ सायलु जल्लोड, लक्ष्मण गंगाराम जल्लोड, श्रीनिवास रामचंद्र मलेपिल्लू, नरेश गंगाधर जल्लोड, लक्ष्मण गंगाधर जल्लोड या सर्वांनी नागेश्वर जल्लोड, पोतन्ना चिनन्ना तोंडाकुलवाड यांच्या मालकीच्या कोठ्यात ठेवले होते.
रविवारी मध्यरात्री (दि. ९) कोठ्यास अचानक आग लागून सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीमध्ये शंकर गंगाराम जल्लोड यांच्या मालकीचे तुषार पाईप ६० नग (किमंत 36,000),सुरेश पोतन्ना तोंडाकुरवाड – ३०० नग (1,80,000) नागेश गंगाराम जल्लोड – ६० नग (किमंत 36000), गंगाधर उर्फ सायलु जल्लोड – ६० नग (किमंत 36000), लक्ष्मण गंगाराम जल्लोड – ८० नग (किमंत 48000), श्रीनिवास रामचंद्र मलेपिल्लू-१०० नग (60,000), नरेश गंगाधर जल्लोड -१०० नग (किमंत 60,000), लक्ष्मण गंगाधर जल्लोड – १०० नग (किमंत 60,000) असे एकूण 5, लक्ष 42 हजार रुपयांच्या किंमतीचे पाईप जळून खाक झाले. या शिवाय संजू दयारवाड यांची एलईडी टीव्ही, (किंमत 16,000) कपडे व अन्य साहित्य, गंगाधर जल्लोड यांची ५०० पेंडी ( किंमत 10,000) कडबा हे सर्व जळून खाक झाले.
ही घटना कळताच गावकरी घटना स्थळावर जमा झाले. परंतु आग ही आटोक्यात आणता आली नाही. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग कोणी तरी लावली असावी, या शंकेवरून शंकर जल्लोड यांनी धर्माबाद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.त्यानुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस विश्वबंर स्वामी करीत आहेत.
हेही वाचा