पैठण पाचोड रोडवरील आखतवाडा पुलावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जखमी | पुढारी

पैठण पाचोड रोडवरील आखतवाडा पुलावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जखमी

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण पाचोड मार्गावरील आखतवाडा पुलावर बुधवारी (दि. ५) दुपारी चारचाकी वाहन पुलावर धडकल्याने झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव राहुल बापूराव केसभट (रा. खेर्डा तांडा ता. पैठण) असे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील नानेगाव येथील सरपंच अनिल बोधणे (वय २३) यांच्या चारचाकीतून (क्र. MH 20 GK 8333) बुधवारी (दि. ५) दुपारी चार वाजताच्या दरम्यान पैठणकडे जात असताना आखतवाडा पुलाला धडक लागल्यामुळे रोडवरच गाडी पलटी झाली. राहुल बापूराव केसभट या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर श्रीराम कल्याण बोधणे (वय २२), कैलास शंकर जाधव (खेर्डा ग्रामपंचायत सदस्य), बद्री नाहणू जाधव हे गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर शरद कारखान्याचे चेअरमन विलास बापू भुमरे, शेखर शिंदे, किशोर चौधरी, स्वप्निल साळवे, दीपक मोरे, राजेंद्र मापारी यांनी तातडीने अपघात स्थळी दाखल होत मदत कार्य सुरु केले. जखमींना प्रथम पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. या अपघातात चारचाकी वाहनाचे भीषण अपघात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पैठण पोलीस करीत आहे.

Back to top button