Beed Accident : केज येथे ट्रकची मोटार सायकलला धडक; बहिण भाऊ जखमी
केज; पुढारी वत्तसेवा : केज येथील शिवाजी महाराज चौकात मोटार सायकल व टिप्परचा अपघात झाला असून या अपघातात धारूर येथील दोघे बहीण भाऊ जखमी झाले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, सोमवार (दि १९ जून) सायंकाळी ५:३० वा च्या सुमारास केज येथील शिवाजी चौकात टिप्पर क्र. (एम एच ४४/९०६५) व मोटार सायकल क्र. एम एच ४४/वाय-५९९३) यांचा अपघात झाला. या अपघातात दीपक भारत शेळके वय (२८ वर्ष) व त्यांची बहीण लता भारत शेळके वय (२५ वर्ष) दोघे रा. धारूर जि. बीड हे दोघे जखमी झाले आहेत. असून दोघांच्याही पायाला दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलीस नाईक नितीन जाधव हे अपघातस्थळी हजर झाले.
अतिक्रमण हटविले तरी वाहने रस्त्यावर उभी
दरम्यान मागील दोन दिवसा पूर्वी केज शहरातील व रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली असली तरी अनेक दुचाकी व इतर वाहने रस्तावर उभी आहेत. त्यामुळे रहदारीची कोंडी होत आहे. वाहतूक शाखेने कारवाई दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

