जालना : आष्टी येथे दारुची अवैध वाहतुक करणाऱ्या पिकअपसह संशयित आरोपीला अटक | पुढारी

जालना : आष्टी येथे दारुची अवैध वाहतुक करणाऱ्या पिकअपसह संशयित आरोपीला अटक

आष्टी; पुढारी वत्तसेवा : परतूर तालुक्यातील आष्टी व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जोरात सुरू असून अवैध धंदे थांबण्याचे नाव घेत नाही मात्र पोलीसांच्या कारवाई सुरूच आहेत. देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारे पिकॶप भल्या पहाटे आष्टी पोलिसांनी पकडले. या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेत पिकॶपसह देशी विदेशी दारूचे बॉक्स असे 3 लाख 36; 900 रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे

रविवारी (दि. ४) सकाळी पाच वाजेच्या सुमारास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस गस्तीवर असतांना सूरुमगाव पाटी ते पांडेपोखरी रस्त्याने पिकॶप क्रमांक (एम एच 21 बी एच 5217) मधून देशी विदेशी दारुची चोरटी वहातूक होत असल्याची माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्या सह सदरील पथकाने पांडेपोखरी येथे पिकॶप ला थांबवून पंचासमक्ष झडती घेतली. यावेळी 36 हजार 900 रूपयाची देशी विदेशी दारु आढळून आली या प्रकरणी पोलीस कर्मचारी विनोद वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सिध्दार्थ दादाराव खरात रा कुंभारी पिंपळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके सहाय्यक उपनिरीक्षक भिमराव मुंडे जमादार डी आर बरले भिमराव राठोड विनोद वाघमारे जि व्ही शिंदे आदींनी केली आहे.

Back to top button