परभणी: गुळखंड येथे वीज कोसळून बैल, गाय दगावले | पुढारी

परभणी: गुळखंड येथे वीज कोसळून बैल, गाय दगावले

कौसडी; पुढारी वृत्तसेवा: जिंतूर तालुक्यातील कौसडी जवळील गुळखंड (ता.सेलू) येथे शेत आखाड्यावर वीज कोसळून बैल व गायीचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.30) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुळखंड परिसरात आज दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण झाले. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुळखंड शिवारातील बाबुराव लंगुटे यांच्या शेत आखाड्यावर बैल व गाय बांधलेली होते. बैल व गायीच्या अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला.

हेही वाचा 

Back to top button