औरंगाबाद : मॅट्रिक्स कंपनीच्या मालकास मागितली ५ कोटींची खंडणी, गुन्हा दाखल | पुढारी

औरंगाबाद : मॅट्रिक्स कंपनीच्या मालकास मागितली ५ कोटींची खंडणी, गुन्हा दाखल

पैठण पुढारी वृत्तसेवा : पैठण एमआयडीसी परिसरात मॅट्रिक्स कंपनीत वारंवार जाऊन कंपनी व्यवस्थापनामधील अधिकाऱ्यांना मारहाण करण्याची धमकी दिली. शिवाय कंपनी सुरू ठेवायची असली तर ४ कोटी व प्रतिमहिना २० हजार रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी संबंधिताविरोधात एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (दि.२४) रात्री गुन्हा दाखल केला. विष्णू बोडके असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या विष्णू बोडके यांना बुधवारी पैठण न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक दिवसापासून मॅट्रिक्स कंपनी कार्यरत असून या कंपनीमध्ये वारंवार जाऊन व्यवस्थापन मधील कंपनी व्यवस्थापकाला मारहाण करण्याची धमकी देण्यात येत होती. यानंतर व्यवस्थापक व कामगारांनी तक्रारी केल्यामुळे सदरील कंपनीचे मालकाने  पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची भेट घेऊन आपल्या कंपनीत होत असलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार खंडणी मागणी करीत असलेल्या विष्णू आसाराम बोडके (रा.मुधलवाडी ता.पैठण) याच्याविरुद्ध मॅट्रिक्स कंपनीचे व्यवस्थापक अझरुद्दीन रेहमदिन पठाण (रा. पिंपळवाडी ता.पैठण) यांनी मंगळवारी दि.२३ रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button