Bees Attack : वेरूळ लेणी पहायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला | पुढारी

Bees Attack : वेरूळ लेणी पहायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

खुलताबाद; पुढारी वृत्तसेवा : वेरूळच्या जगप्रसिद्ध कैलास लेणी येथे शनिवारी (दि. ८) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पंधरा ते वीस पर्यटक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिकांनी सर्व जखमी पर्यटकांना वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले.

याबाबत अधिक माहिती अशी की वेरूळ येथील १६ क्रमांकच्या कैलास लोणी येथील वरील भागास काही पर्यटक हे लेणी बघण्यासाठी आलेले होते. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मधमाशांचे पोळे उठले आणि काही कळण्याच्या आत पर्यटकांवर हल्ला केला. या जखमी पर्यटकात रघुनंदन कडापा, कार्तिका कडापा, स्पंदना कडापा, सहाना कडापा, पलानीस्वामी, रेखा कुमारी, यांच्यासह १५ ते २० पर्यटक या मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले. वेरूळ येथील शेख आसिफ, संजय बनकर, भास्कर घाडगे आणि मनोज मडकर या स्थानिकांनी जखमी पर्यटकांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. सर्व जखमी पर्यटकांच्या चेहरा, हात, पाठ आणि मानेवरील मधमाशांनी चावा घेतलेले काटे काढून टाकेल व आईस पॅक लावून औषधोपचार करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाआरोग्य अधिकारी जी.एम कुंडलीवार यांनी देखील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी झालेल्या पर्यटकांची भेट घेऊन पाहणी केली. तसेच पर्यटकांना किमान दोन तास निरीक्षणाखाली ठेवण्याचे सांगितले.

प्रथमोपचार पेटी व साईन बोर्ड लावण्याची आवश्यकता

वेरूळ या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी ज्याप्रमाणे इतर साइन बोर्ड लावलेले आहेत, त्याप्रमाणे मधमाशा, साप, विंचू, कीटक, जंगली प्राणी याबाबतची माहिती देणारे बोर्ड लावणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यासाठी वेरूळ लेणी या ठिकाणी प्रथमोपचार पेटीची नितांत आवश्यकता आहे. आजच्या घटनेतील एखादा पर्यटक वरून खाली पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. तरी भारतीय पुरातत्त्व विभागाने या घटनेची खबरदारी घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
– सतीश देवेंद्र लोखंडे वेरूळकर, (सचिव एलोरा हेरिटेज फाउंडेशन)

हेही वाचा

Back to top button