गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसाप्रकरणी ३२ जणांवर गुन्हा दाखल

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील आपेगाव, साष्टपिंपळगाव, गोंदी सिद्धेश्वर पॉईंट ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातुन ट्रॅक्टर केणी द्वारे अवैध वाळू उपसा व साठा करणाऱ्या 32 जणांवर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईट येथील 70 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला साठा पोलीस कॉलनीत हलविण्यात आला आहे, अशी माहिती अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे.
गोंदीच्या सिद्धेश्वर पॉईंटवर गुरुवारी कारवाई केल्यानंतर पुन्हा तहसीलदार व महसूल पथकाने गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईट येथील 70 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त केला. गोंदी पोलीस ठाण्यात कलम 379 3 व 4 नुसार शनिवारी (दि. 1 एप्रिल) ३२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाई मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे
याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनंतर सादिक शेख (रा. पाथरवाला ता. अंबड), ईश्वर लहोरे, जुबेर शेख,अदनान शेख, समीर शेख, जुगन विठोरे,लहू कटे, दादासाहेब राक्षे, एजाज शेख, गजू मोरे (सर्व रा. साष्टपिंपळगाव), विकास भाऊसाहेब कनके (रा. भांबेरी ता. अंबड), मंगेश माऊली चौधरी, महेश बाळू चौधरी, कैलास पंढरीनाथ चौधरी (सर्व रा. आपेगाव), संभा नाथा मोरे (रा. पाथरवाला बुद्रुक ता. अंबड) अक्षय राजाभाऊ बाणाईत, संतोष सखाराम कांबळे, तेजस खराद, ज्ञानेश्वर देविदास खरात, आकाश सुरेश खराद, संभाजी दिनकर खराद, अशोक कुलेकर, विकास खराद, राहुल खराद, आकाश भोंडे, मनोज सुरेश खराद, दत्ता रुघनाथ शिंदे, महादेव उत्तम खराद, सोपान खराद, पाराजी बबन शिंदे, किशोर प्रभाकर खराद (सर्व रा. गोंदी).