परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याची सुपारी | पुढारी

परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याची सुपारी

परभणी, पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना दुसऱ्यांदा जिवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याची माहिती खासदार जाधव यांनी दिली. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी नांदेडच्या रींधा टोळीकडून खासदार जाधव यांना जिवे मारण्यासाठी अशाच प्रकारची सुपारी घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा खासदार जाधव यांच्यासाठी सुपारी देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

खासदार जाधव हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेमध्ये सक्रिय आहेत. 2004 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. 2009 मध्ये ही विधानसभेत ते निवडून गेले होते. त्यानंतर 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते शिवसेनेकडून निवडून आले. खासदार जाधव यांना जिवे मारण्यासाठी तीन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांना या संदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या प्रकाराची माहिती देण्यात आली असून, खासदार जाधव यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button