जालना : पिकअपची दुचाकीला धडक; एकजण जागीच ठार | पुढारी

जालना : पिकअपची दुचाकीला धडक; एकजण जागीच ठार

घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा पिकअप ट्रक आणि मोटारसायकलच्या अपघातात घनसावंगी येथील प्रसिद्ध व्यापारी विजय जैन यांचा मुलगा वर्धमान जैन याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी मत्सोदरी सुतगिरणी जवळ हा अपघात झाला. दरम्‍यान त्‍याचा मित्र रूद्र पवार हा किरकोळ जखमी झाला. या घटनेनंतर घनसावंगी शहरावर शोककळा पसरली आहे.

या विषयी सविस्तर माहिती अशी की, घनसावंगी वरून रामगव्हान येथे शेतात चक्कर मारायला वर्धमान जैन आपल्या रूद्र पवार या मित्राला घेऊन गेला होता. वर्धमान जैन (वय 16) हा मोटारसायकलवरून जात असताना अंबड घनसावंगी रोडवरील सुतगिरणी जवळ पिकअप गाडीने त्‍यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर त्‍याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घनसावंगी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला. तर रूद्र पवार याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्‍याने त्‍याला जालना येथे पाठविण्यात आले. या घटनेनंतर घनसावंगी शहरावर शोककळा पसरली होती.

हेही वाचा : 

Back to top button