हिंगोली: गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान | पुढारी

हिंगोली: गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील माळधामणी येथे आज (दि.१८ ) दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. गारांमुळे, आंबा, भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

औंढा तालुक्यातील पिंपळदरी, जलालढाबा, कमलनुरी तालुक्यातील वाकोडी, बाभळी, गोळ बाजार परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. माळधमनी येथे 3 ते 4 एमएम व मध्यम आकाराच्या गारा पडल्याने बागांचे मोठे नुकसान झाले. तसेच आंबा व इतर फळबागांचेही मोठे नुकसान झाले. या अवकाळी पावसाने शेतावर उभी असलेली व काढून टाकलेल्या गहु, हरभरा, ज्वारी, करडी या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

हेही वाचा 

Back to top button