हिंगोली : औंढा नागनाथ विश्रामगृहासमोर 9 लाखांचा गांजा पकडला | पुढारी

हिंगोली : औंढा नागनाथ विश्रामगृहासमोर 9 लाखांचा गांजा पकडला

हिंगोली ; पुढारी वृत्‍तसेवा औंढा नागनाथ येथे (शुक्रवार) परभणी जिल्ह्यातून एका वाहनातून गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पांढऱ्या रंगाच्या कार क्रमांक एम एच 12 के एन 2160 या गाडीवर छापा टाकला. यावेळी 38 किलो ६०० ग्रॅम वजनाचा तब्‍बल 9 लाख 65 हजारांचा मुद्‍देमाल पोलिसांनी हस्‍तगत केला.

दरम्‍यान यावेळी (32 वर्षीय) शेख गौस शेख पाशा वाहन चालक राहणार मस्तानपूर तालुका पुर्णा जिल्हा परभणी, दुसरा आरोपी रवींद्र अमरसिंग राठोड राहणार कृष्णा तालुका जिल्हा वाशिम, तिसरा आरोपी शेख मेहुद्दीन शेख अल्लाउद्दीन (वय 36) राहणार भीमवाडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांना अटक करण्यात आली.

त्‍यांच्याकडे 14 लहान- मोठ्या वजनाची गांजाची गठ्ठे ज्यांचे वजन 38 किलो 600 ग्रॅम असून, अंदाजे किंमत 9 लाख 65 हजार रुपये आणि वाहन यासह 14 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून औंढा नागनाथ येथे आरोपींवर गुन्हा दाखल केला. सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवशंभ घेवारे यांनी ही कारवाई केली.

यामध्ये जमादार संभाजी लेखोळे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर पायगन, गणेश लोकरे, तुषार ठाकरे, प्रशांत वाघमारे, रविकांत हरकळ, गजानन गिरी, पंजाब थिटे यांचे मोलाचे योगदान लाभले. गांजा, देशी दारू, गुटखा आधीचे धंदे राजरोज चालू असल्याचे यावरून दिसून येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button