जालना : वाळू साठा जप्त केल्याने अंबड तहसीलदार कडवकर यांना मारहाण | पुढारी

जालना : वाळू साठा जप्त केल्याने अंबड तहसीलदार कडवकर यांना मारहाण

अंबड; पुढारी वृत्तसेवा : साष्टी पिपंळगाव व गोंदी येथील वाळुसाठा का जप्त केला याचा जाब विचारत गोंदी येथील पंकज सोळुंके यांनी अंबड तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली.

अंबड तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी अंबड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  बुधवारी (दि.22) दुपारी 2:30 ते 3 च्या सुमारास पंकज सोळंके यांनी परवानगी न घेताच तहसीलदार कक्षात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी त्यांना कर्मचाऱ्यांना अडवले असता, तु माझा फोन का घेत नाही, तु काल आमचे साष्ट पिपंळगाव व गोंदी येथील वाळुसाठा व केणी का जप्त केल्या, तसेच गोंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा का दाखल केला असे जाब विचारत शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर मारहाण आणि धमकी दिल्याची फिर्याद तहसीलदार कडवकर यांनी दिली. त्यानंतर पंकज सखाराम सोळंके याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांचेकडे देण्यात आल्याची माहिती ठाणे अमलदार रविंद्र चव्हाण यांनी दिली.

यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस ,गटविकास अधिकारी विवेक जमदडे,तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी सह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच आरोपीला तात्काळ अटक करावी व जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करणार असल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले.

गोंदी भागात अवैध धंदे खुलेआम सुरू आहे

गोंदी आणि सर्वांचीच चांदी असे म्हटले जाते. गोदी भागात सध्या सर्व प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरू आहे यामधे मुख्य म्हणजे वाळू दारू,जुगार, गुटखा असे सर्व धंदे खुलेआम सुरू आहे यावर प्रशासन तेरी चूप मेरी चूप च्या भूमिकेत दिसत आहे. यामुळे अनेक व्यवसाय अवैधरित्या चालू असल्याने अनेक व्यक्ती आपले खिसे गरम करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Back to top button