बीड : जय महेश साखर कारखान्यात बेल्टला अडकुन कामगारांचा मृत्यू; माजलगाव तालुक्यातील घटना | पुढारी

बीड : जय महेश साखर कारखान्यात बेल्टला अडकुन कामगारांचा मृत्यू; माजलगाव तालुक्यातील घटना

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश शुगर इंडस्ट्रीज या कारखान्यातील भुस्याच्या बे्ल्टला अपघात होवुन कामगाराचा मृत्यू झाला. कल्याण तोले (वय ४०) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

कल्याण गणपत तोले (वय ४०) हा तरुण माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्यात काम करत होता. कारखान्यातील भुसा ओढण्याच्या बेल्टवर अडकलेला भुसा काढत असताना ओढला गेल्याने मयत कामगार कल्याण तोले गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली. या कामगाराला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. मयत कामगार हा माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवासी असून कारखान्यांमध्ये कायम कामगार म्हणून नियुक्ती होती. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button