नांदेड : मुदखेड पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीत वेगवेगळ्या घटनेतील चौघे जेरबंद

नांदेड : मुदखेड पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीत वेगवेगळ्या घटनेतील चौघे जेरबंद
Published on
Updated on

मुदखेड; पुढारी वृत्तसेवा : मुदखेड पोलीस ठाण्याअंतर्गत मोटारसायकल चोरी व लूटमारीच्या घटना घडत असल्यामुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. काही दिवसांपूर्वी मोटार सायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर फायनान्स कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना दिवसा ढवळ्या लुटून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चार चोरट्यांना जेरबंद करुन मुदखेड पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कामगिरी केली. त्यामुळे वेगवेगळ्या घटनेतील चोरट्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.

गेल्या दोन महिन्यापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका खासगी फायनान्स कंपनीचे फिल्ड ऑफिसर राम जाधव हे दि. २५ जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्याकडे जमा झालेल्या कर्जाचे हप्ते घेऊन मुदखेड कडे निघाले होते. यावेळी मुदखेड भोकर रोड डोरली गेट लगत दोन दुचाकी अचानक समोर आल्या. या दुचाकीस्वारांनी खंजर व तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील एक लाख तीस हजार इतकी रोख रक्कम जबरदस्तीने लुटून पसार झाले होते. संबंधिताच्या फिर्यादीनुसार मुदखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शहरालगत असलेल्या न्याहाळी येथेही एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला खंजरचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल टॅब दिवसाढवळ्या लंपास करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही लुटमारीच्या घटना उजेडात आणण्यासाठी तपास सुरु केला. या लुटमारीच्या घटनेमध्ये कोल्हा येथील मदन केशव बट्टेवाड, भास्कर केशव बट्टेवाड, आकाश दिगंबर वाघमारे (रा.नांदेड),अजय राठोड (रा.वरदडा तांडा) या चार आरोपींना मुदखेड पोलिसांनी अटक करून जेरबंद केले असून त्यांच्याकडून चार मोटारसायकली व तीन मोबाईल असा १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही लुटमारीची घटना स्थानिक पोलिसांनी उजेडात आणल्यामुळे जिल्ह्यातील अन्य ठिकाणी झालेल्या लुटमारीच्या घटना उजेडात येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मोटरसायकल चोरट्यांचा दिवसाढवळ्या नागरिकांना लुटणाऱ्या लुटारूंच्या देखील पोलिसांनी आता मुसक्या आवळल्या आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, भोकर येथील अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे यशस्वी करण्यात आली. या उल्लेखनीय कार्यवाहीमध्ये पोलीस निरीक्षक महेश शर्मा , सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वटाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक काळे, पो .हे. का .कदम ,पो .हे. का .विजय आलेवाड, चंद्रशेखर मुंडे ,रवी लोहाळे, बलवीर सिंह ठाकुर, बालाजी गीते, विनायक मठपती, जाधव, सायबर सेलचे राजू सिटीकर, दीपक ओढणे या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू वटाणे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news