लातूरमध्ये तलवारीने केक कापने आले अंगलट; बर्थडे बॉयसह सहा मित्रांविरोधात गुन्हा | पुढारी

लातूरमध्ये तलवारीने केक कापने आले अंगलट; बर्थडे बॉयसह सहा मित्रांविरोधात गुन्हा

लातूर; पुढारी वृतसेवा : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयसह त्याच्या सहा मित्रांविरोधात येथील विवेकांनद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जव्वाद अजमद देशमुख (वय 22, बर्थडे बॉय) , वशीम खलील शेख ( वय 22 ), मेहताब माजीद शेख (वय 18), अफताफ उर्फ अरबाज शेरखान पठाण (वय 21), अबरार अरशद देशमुख (वय 23 ) या आरोपींना अटक करण्यात आली असून अतुल्ला अस्लम देशमुख व साहील सिकंदर शेख हे आरोपी फरार आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृपासदन रोडवर काही तरुणांनी एकत्र येऊन बर्थडेचा केक तलवारीने कापला होता. त्यातील काही तरुण तलवारी बाळगून आहेत,अशी गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांना मिळाली होती. त्यावरून पथकाने ७ फेब्रुवारी रोजी त्या परिसरात संबधीत तरुणांचा शोध घेतला.

त्यांच्याकडून दोन लोखंडी तलवारी व एक कत्ती जप्त करण्यात आली आहे . पाच आरोपींना अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button