नांदेड : आरोग्य सेवकाच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची सात लाखांची फसवणूक | पुढारी

नांदेड : आरोग्य सेवकाच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची सात लाखांची फसवणूक

किनवट, पुढारी वृत्तसेवा : गंगानगर भागात राहणाऱ्या सुशिक्षित बेकार तरुणाने दोन वर्षापूर्वी आरोग्य सेवकाची नोकरी लावून देतो म्हणून सहा व्यक्तींनी संगनमताने सात लाख रुपये उकळले. या प्रकरणी सचिन मोहन जाधव (वय ३४) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. नंदराव सोनकांबळे, राहुल सोनकांबळे, अमोल शिंदे, सुरेश डोंगरे, ज्ञानेश्वर साळवे व आशिष खडसे असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या संशयित आरोपींची नावे आहेत.

सचिन जाधव याने फिर्यादीत म्हटले, कोरोना काळात २०२० मध्ये आनंदराव रामजी सोनकांबळे याने सचिनच्या वडिलांसोबत माझ्या घरी आले. त्यांनी अमरावती आरोग्य विभागात लिपिक व आरोग्य सेवकांच्या जागा निघाल्या आहेत. लिपिकासाठी १२ लाख तर आरोग्य सेवकासाठी ८ लाख रुपये रेट आहे. तुमची पैसे द्यायची तयारी असल्यास मी जमवून देईन, असे सांगितले. यानंतर सचिन आणि त्यांच्या वडिलांनी सरकारी नोकरीच्या आमिषाने आरोग्य सेवक पदासाठी ७ लाख रूपये देण्याचे मान्य केले.

सचिन जाधव याच्या वडिलांनी शेती व सोने गहाण ठेऊन ३० जुलै २०२२ रोजी आनंदराव सोनकांबळे यांना अडीच लाख रुपये दिले. पुढे १६ ऑगस्टला ४ लाख २० हजार रुपये पुन्हा एकदा दिले. दरम्यान, २० ऑगस्ट २०२० रोजी सोनकांबळे यांचा निरोप आला आणि ताबडतोब नोकरीच्या जागी पोहचण्यास सांगितले. सचिन जाधवने उर्वरित पैसे देऊन रूजू होण्यासाठी ऑर्डर घेतली. मात्र, यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यानंतर संप चालू असल्यामुळे तुमचा कामाला वेळ लागेल, अशा टोलवाटोलवीच्या उत्तरामुळे सचिन जाधव यास संशय आला. त्याने २ वर्षे संबंधित व्यक्तींकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पो.नि.अभिमन्यू साळुंखे हे करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button