परभणी: येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले; २२ हजार १२० क्युसेक विसर्ग सुरू | पुढारी

परभणी: येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले; २२ हजार १२० क्युसेक विसर्ग सुरू

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा: परतीच्या मुसळधार पावसामुळे येलदरी धरण १०० टक्के भरले आहे. त्याचबरोबर विदर्भातील खडकपूर्णा धरणातून पाण्याची आवक येलदरी धरणात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे आज (दि.१९) दुपारी २ वाजता धरणाच्या १० गेटमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुमारे 22120 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पॉवर जनरेशनमधून 1800 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

या वर्षी एकूण सरासरी 868 मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी आज रोजी 1224 मिमी पासून पडला होता. सध्या पाण्याची लेवल 461.772 मीटर असून एकूण उपलब्ध पाणीसाठा धरणात 809.770 दलघमी आहे. आज सकाळी 10 वाजता ६ गेट उघडले होते. नंतर दुपारी ४ गेट उघडण्यात आले. नदीपात्रात विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button