नांदेड: स्कूल बसच्या धडकेत २ म्हशी ठार; २ गंभीर जखमी | पुढारी

नांदेड: स्कूल बसच्या धडकेत २ म्हशी ठार; २ गंभीर जखमी

सारखणी; पुढारी वृत्तसेवा : किनवटवरून माहूरकडे जाणाऱ्या स्कूल बसने सारखणी घाटात म्हशीच्या कळपाला जोराची धडक दिली. यात दोन म्हशी ठार, तर दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या. ही घटना आज (दि. १६) सायंकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेलंगना राज्यातील ही स्कूल बस (ए पी 16 टीसी 4744) राजस्थानकडे निघाली होती. किनवट – सारखणी मार्गावरील सारखणी घाटात बसने म्हशीच्या कळपाला जोराची धडक दिली. यात दोन म्हशी ठार झाल्या. तर दोन जखमी झाल्या आहेत. सारखणी येथील हिरा नाईक यांच्या या म्हैशी असल्याचे समजते.दरम्यान, बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही. सिंदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी घटनास्थळी जाऊन बस चालकाला ताब्यात घेतले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button