जाफराबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या | पुढारी

जाफराबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

जाफराबाद : पुढारी वृत्तसेवा

जाफराबाद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या आवारात वरुड बु. येथील सिताराम ईश्राम देव्हडे वय ७५ वर्ष यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज ( दि. ७ ) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

एका वृद्ध शेतकऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या व तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामाच्या बाजुनेच असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याने परीसरातील नागरीकांनी एकच गर्दी केली होती.

सदरील घटनेची माहीती मिळताच पोलीस उप निरीक्षक पि. व्ही. मदन, पोलीस उप निरीक्षक व्हि.एस. तडवी, पोलीस कॉन्स्टेबल शाबान तडवी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. उपस्थितांच्या मदतीने पोलीसांनी मयत देव्हडे यांचा मृतदेह खाली उतरवला.

जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट होवु शकले नाही. जाफराबाद पोलीस ठाण्यात याबाबात आकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली.

Back to top button